बाहेरचे लोक आपलेपणाने मदत करणार नाहीत; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष टोला
पुणे महापालिकेच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज अजित पवार यांनी बोलताना चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. बाहेरचे लोक आपलेपणाने मदत करणार नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
पुणे : महापालिका निवडणुकीचं रणशिंग अजित पवारांनी फुंकलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. बाहेरचे लोक आपलेपणाने मदत करणार नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तुम्ही मागे ज्यांना निवडूण दिले त्यातील किती जणांनी पुण्याचे प्रश्न सोडवले. मी खात्री देतो की यावेळी घड्याळाच्या चिन्हावर जे नगरसेवक निवडूण येतील ते पुण्यातील प्रश्न नक्की सोडवतील. बाहेरचे लोक आपलेपणाने मदत करणार नाहीत असे म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.