‘अजित पवार गटाकडून छे छे छे… ‘तो’ तर चिल्लर नेता’, अनिल देशमुख यांची नेमकी टीका कुणावर ?
महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा होत आहेत. त्यांच्या सभेला किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो हे महाराष्ट्र पाहत आहे. मी शरद पवार यांचा खंदा कार्यकर्ता आहे. भाजपची ऑफर स्वीकारली नाही म्हणून मला तुरुंगात टाकले.
मुंबई : 31 ऑगस्ट 2023 | राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मी भाजपमध्ये जाण्यास नकार दिला म्हणून मला तुरुंगात टाकलं. ईडी आणि सीबीआयला हाताशी धरून दबाव टाकला जात आहे. माझ्याही बाबतीत तेच करण्यात आलं, असा आरोप भाजपवर केला. देशातले अनेक महत्वाचे विषय आहेत ते घेऊन आघाडी बनली आहेत. जागावाटप किंवा पंतप्रधान पदाचा चेहरा या सध्या दुय्यम गोष्टी आहेत. सध्या तरी भाजपाला पर्याय म्हणून समविचारी पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत, असे ते म्हणाले. मी शरद पवार यांच्या अतिशय जवळचा आणि शेवटपर्यंत सोबत राहणार आहे. मी शरद पवार साहेबांचा खंदा समर्थक आहे त्यांची साथ सोडणार नाही. त्यामुळे कुणी काहीही बोलले तरी त्याला अर्थ नाही. अजित पवार गटाकडून निवडणूक लढविण्याचा प्रश्न नाही. भाजपचे गिरीश महाजन यांचे बोलणे काय मनावर घ्यायचे. तो तिकडचा चिल्लर नेता आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.