Chhagan Bhujbal | ‘राज साहेब मनाचा कोतेपणा दाखवू नका’ – छगन भुजबळ
मूळ विषयांकडे लक्ष जाऊ नये म्हणून हे विषय काढत आहेत. महाराष्ट्राला आग लावण्याचे काम करू नका. राज साहेब उद्धव ठाकरे उत्तमपणे काम करत आहेत. राज ठाकरे असा कोतेपणा दाखवू नका. उद्ध्व ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी दंगे माजवण्याचे काम करू नका, असे छगन भुजबळ म्हणाले.
नाशिक : राज ठाकरे काल म्हणाले ते चुकीचे आहे. खरी परिस्थिती मी सांगतो. शिवाजी महाराजांची समाधी कधी बांधली ? महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1870 साली समाधी शोधली. रायगडवर आबासाहेब घाडगे (शाहू महाराजांचे वडील ) यांनी इच्छा व्यक्त केली होती. शाहू महाराजांच्या वडिलांनी निधी गोळा केला. टिळकांनी एक खडासुदधा तिथे नेलेला नाही. 1926 च्या नंतर होळकर मंडळी आली आणि समाधीचं काम पूर्ण केलं. टिळकांचं काम पूजनीय पण खोटा इतिहास सांगू नका. दिल्लीत सुद्धा खोटा सांगितला जातोय, गांधी परिवाराचे नाव पुसण्याचं काम सुरुंय. पवार साहेबांवर टीका करण्यासाठी खोटं बोलू नका. पाणी, पेट्रोल-डिझेल, महागाई, बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्याकडे लक्ष द्या. या मूळ विषयांकडे लक्ष जाऊ नये म्हणून हे विषय काढत आहेत. महाराष्ट्राला आग लावण्याचे काम करू नका. राज साहेब उद्धव ठाकरे उत्तमपणे काम करत आहेत. राज ठाकरे असा कोतेपणा दाखवू नका. उद्ध्व ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी दंगे माजवण्याचे काम करू नका, असे छगन भुजबळ म्हणाले.