बरगड्या तुटल्या, श्वास घेता येईना, हलताही येत नव्हतं; अपघातानंतर पहिल्यांदाच बोलताना धनंजय मुंडे भावूक

| Updated on: Feb 13, 2023 | 9:41 AM

अपघातानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी परळीकरांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी अपघातानंतर काय-काय घडलं ते सांगितलं. पाहा...

परळी, बीड : माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा काही दिवसांआधी अपघात झाला. त्यानंतर ते काल पहिल्यांदाच बीडमध्ये आले. अपघातानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी परळीकरांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी अपघातानंतर काय-काय घडलं ते सांगितलं.” माझा अपघात झाला. या अपघातात काय झालं तुम्हाला माहित आहे. माझ्या बरगड्या तुटल्या. बरगड्या तुटल्यावर काय होतं हे मी अनुभवलंय. काहीच करता हेत नाही.हलता येत नाही. अगदी श्वासही घेता येत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.

Published on: Feb 13, 2023 09:41 AM
कसबा पोटनिवडणुकीची जबाबदारी शिंदे गटाच्या ‘या’ दोन नेत्यांवर; रणनिती काय? पाहा…
आदित्य ठाकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्री कुठे बोलतात आणि कुठे नाही याचे कारण