गुलाबराव पाटील यांच्यानंतर भाजपच्या आमदाराविरोधात खडसे यांनी दाखल केला मानहानीचा खटला

| Updated on: Jul 16, 2023 | 9:26 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी, आम्ही तुमचा खरा इतिहास बाहेर काढू असा इशारा देत टिका केली होती.

जळगाव : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता भाजपचा एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या रडावर आला आहे. चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर खडसे यांनी जळगावच्या सेशन कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला त्यांनी बदनामी प्रकरणी खटला दाखल केला आहे. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी २८ मे २०२३ रोजी माध्यमांसोबत बोलताना आपल्यावर बदनामीच्या उद्देशाने टीका केली होती. अपमानजनक शब्द वापरुन बदनामी व मानहानी केली. याप्रकरणी त्यांच्यावर मानहानी व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ ए प्रमाणे शिक्षेसाठी जळगाव मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडे फौजदारी खटला दाखल केल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी, आम्ही तुमचा खरा इतिहास बाहेर काढू असा इशारा देत टिका केली होती. तसेच तर खडसे म्हणजे विकृती आहेत. मात्र वयाने मोठे असूनही त्यांना राजकारणात एक चांगला आदर्श पायंडा घालता आला नाही. खडसे हे एक विकृती आहे. या माणसाने आयुष्यात काहीही चांगलं केलं नाही. नको त्या भानगडी लावल्या. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एव्हढी धुसमूस आहे की, राष्ट्रवादी खडसे नसते तर चांगल्या परिस्थितीत होती. कपाळकरंटं माणूस कसं असतं, तसा आहे माणूस आहे. राष्ट्रवादीला पनवती आहे. तिथं गेले आणि पूर्ण राष्ट्रवादीचा सत्यानाश करत आहे. बरं झालं तिकडे गेले असे विधान केलं होतं.

Published on: Jul 16, 2023 09:26 AM
अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता…
“मुख्यमंत्री शिंदे यांच्या आमदारांची गाडी परत अजित पवार यांच्या टोलनाक्यावर येऊन थांबली”, काँग्रेसचा टोला