Video | गुवाहटीत गेलेल्या आमदारांच्या वक्तव्यांनीच खोका हा विषय जनतेपर्यंत… एकनाथ खडसे पुराव्यांबद्दल काय बोलले?

| Updated on: Nov 10, 2022 | 9:58 AM

मानहानीची नोटीस द्यावी, त्यानंतर खुलासा होईल. जनतेसमोर सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

मुंबईः खोक्यांचा व्यवहार हा आतला व्यवहार असतो त्यामुळे खोके घेतले, नाही घेतले याला पुरावा असू शकत नाही. मात्र शिंदे सरकारच्या आमदारांमुळेच हा विषय एवढा जनतेपर्यंत पसरल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांनी केलंय. ते म्हणाले, ‘ गुवाहाटीपासून (Guwahati) खोक्यांची सुरुवात झाली व शिंदे गटाचे आमदार ज्यावेळी गेले होते त्यांनीच खोक्यांचा विषय काढला. सूचक असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळेच खोक्यांचा (Khoke) विषय हा जनतेपर्यंत पोहोचला. खोके घेतले किंवा नाही घेतले हे पुराव्यानिशी देणं हे अत्यंत अवघड आहे. मग मानहानीचा दावा कशासाठी. असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. खोके घेतले म्हणजे तुम्ही पैसे घेतले असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे मानहानीची नोटीस द्यावी, त्यानंतर खुलासा होईल. जनतेसमोर सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

Published on: Nov 10, 2022 09:53 AM
Video : साई रिसॉर्ट प्रकरणी अडचणी वाढणार? अनिल परब यांना पोलीस समन्स बजावणार
Video:संजय राऊत ठाकरेंसाठी किती महत्त्वाचे? हे दृश्य हजार शब्दांपेक्षा जास्त बोलून गेलं!