Big News : हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीची धाड; दीड महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई

| Updated on: Mar 11, 2023 | 8:47 AM

Hasan Mushrif Kagal Home ED Raid : माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. मागच्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे.

कागल, कोल्हापूर : माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. मागच्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे. आज पहाटेच्या सुमारास ईडीचे चार ते पाच अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या घरी चौकशी केली. मागच्या वर्षभरापासून हसन मुश्रीफ यांची चौकशी केली जात आहे. मागच्या दीड महिन्यात ही दुसऱ्यांदा चौकशी केली जात आहे. “ईडीची ही धाड आश्चर्यकारक आहे. सत्तेचा गैरवापर करत मुश्रीफ यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

Published on: Mar 11, 2023 08:37 AM
पुणे शहरात ‘या’ दिवशी वादळी वार्‍यांसह हलक्या पावसाचा इशारा
Super Fast News | सांगलीत खासदार इम्तियाज जलील यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध