Jayant Patil | मागील पिढीनं काहीच केलं नाही, असं सांगायची प्रथा अलिकडच्या काळात सुरु झालीय
जगातील कोणत्याही देशाचा ऱ्हास कधी सुरु होतो, जेव्हा आपण मागच्या पिढीने केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्याला सुरुवात करतो. तेव्हा त्या पिढीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते, असेही ते म्हणाले.
अकोला : मागच्या पिढीचा आपण नेहमी आदर ठेवला पाहिजे, परंतु आता मागच्या पिढीचा अनादर करण्याची प्रथा प्रवृत्ती वाढलीय. मागील पिढीने काहीच केलं नाही, असं सांगण्याची प्रथा आता अलिकडच्या काळात सुरु झालीय, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. ते अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये आयोजित सहकार नेते तथा माजी आमदार भैय्यासाहेब तिडके यांच्या 75 व्या अमृत महोत्सव सोहळ्यात बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की, जगातील कोणत्याही देशाचा ऱ्हास कधी सुरु होतो, जेव्हा आपण मागच्या पिढीने केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्याला सुरुवात करतो. तेव्हा त्या पिढीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते, असेही ते म्हणाले.