जेवढे मोदी – शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा, जयंत पाटील यांचा दावा

| Updated on: Nov 09, 2024 | 4:13 PM

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना निवडणूकीनंतर काम उरणार नाही. महायुतीला 50- 60 पार करणं कठीण जाणार आहे अशी टीका राष्ट्रवादी नेते प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

लोकसभेला जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या होत्या तेथील भाजपाच्या जागा पडल्या होत्या. विधानसभा निवडणूकीला ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जेवढ्या अधिक सभा होतील तेवढ्या अधिक जागा आम्हाला मिळतील असा दावा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पंढरपूरला महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत आता मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे देखील जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. अजित पवार यांच्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याच्या फायलीवर आरआर आबा यांनी सही करुन केसाने गळा कापला असा आरोप अजितदादांनी केला होता.त्यावर जयंत पाटील म्हणाले आरआर आबा तर मधेल एक मंत्री होते. परंतू अंतिम सही मुख्यमंत्री करीत असतात त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नाव मात्र सांगितले जात नाही असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. छगन भुजबळ यांनी आपण ओबीसी असल्याने ईडीचा त्रास आपल्याला अधिक झाल्याचा दावा केला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी जे भाजपात गेले त्यांना ईडीचा त्रास कमी झाला, पण जे नाही गेले त्यांना कमी अधिक त्रास होतोच असतो असेही जयंत पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीला विधान सभेत 170 ते 180 जागा मिळतील असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Published on: Nov 09, 2024 04:12 PM
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला ‘एटीएम’ बनवले, नाना पटोले यांची टीका