Maharashtra Politics : राऊत यांनी अजित पवार यांच्यावर विधान केलं, राष्ट्रवादीचा नेता भडकला, म्हणाला, ‘मग…’

| Updated on: Jun 04, 2023 | 8:21 AM

काही कालावधीपासून यांच्यात वितुष्ट आल्याचे दिसत आहे. याच्याआधी देखील काही कारणावरून राऊत आणि अजित पवार यांच्यात जोरदार जुंपली होती. ते वाद मिटले होते. तोच आता नवा वाद सुरू झाला आहे. यावरून सध्या राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात वाद होत आहेत.

मुंबई : महाविकास आघाडी असो की महाराष्ट्राचं राजकारण यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे महत्वाचे मानले जातात. मात्र काही कालावधीपासून यांच्यात वितुष्ट आल्याचे दिसत आहे. याच्याआधी देखील काही कारणावरून राऊत आणि अजित पवार यांच्यात जोरदार जुंपली होती. ते वाद मिटले होते. तोच आता नवा वाद सुरू झाला आहे. यावरून सध्या राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात वाद होत आहेत. काल राऊत यांनी केलेल्या त्या वक्तव्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी थेट राऊत यांनाच इशारा दिला आहे. त्यांनी, अजित पवार यांच्यावर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही, त्यामुळे नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे असा इशाराच त्यांनी ठाकरे गटाला दिला आहे. त्यामुळे हा इशारा आता मविआच्या भवितव्यावर उठणार का हेच पहावं लागेल.

 

Published on: Jun 04, 2023 08:21 AM
“…तर संजय राऊत यांची जीभ छाटून टाकू”, शिवसेनेची ‘ही’ महिला नेता आक्रमक, म्हणाली…
संजय राऊत यांच्या ‘त्या’ कृत्यावर दिपाली सय्यद म्हणाल्या…