‘क्रेडीट घेण्यासाठी ही घडपड’; कांद्यावरून झालेल्या निर्णयावरून रोहित पवार यांचा कोणाकडे रोख
राज्यीत कांद्यावरून वांदा झाल्यानंतर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जापान दौऱ्यातून यावर दिल्लीत बोलणं केलं आणि केंद्राने यावर निर्णय घेतला. यावरून सध्या क्रेडीटची चर्चा रंगली आहे.
कोल्हापूर : 23 ऑगस्ट 2023 | कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यात जोरदार विरोध केला. तर राज्यातील महत्त्वाच्या १५ एक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा लिलाव बंद पाडला. गेली तीन एक दिवस हे लिलाव बंद आहेत. त्यामुळे ७० ते ८० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सुरू असलेल्या गदारोळानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली आणि त्यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली. मात्र याच प्रश्नासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे देखील दिल्लीला गेले होते. ते देखील पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून यावर केंद्राने विचार करावा अशी विनंती करणार होते. याच दरम्यान केंद्रीय मंत्री गोयल यांनी दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर आपले कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचा विश्वास नव्हता का असा सवाल केला आहे. तसेच फक्त क्रेडीट घेण्यासाठीच भाजपने ही खेळी केली. तर फडणवीस यांनी जापानमध्ये बसून ते ट्विट केलं असा आरोप केला आहे.