अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावर विधानसभा अध्यक्षांनीही सोडलं मौन; पहा काय म्हणाले…
पत्रकारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विचारलं असता त्यांनी पॉझिटिव्ह वातावरणात अजून कुठला पॉझिटिव्ह बद्दल जर होणार असेल तर त्याचं स्वागत होईल असं म्हणत अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाला एकाअर्थी हिरवा कंदिल दिला आहे
मुंबई : राष्ट्रवादी नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उत आला होता. ते प्रकरण आता शांत झालं आहे. ते राष्ट्रवादी सोडून, 40 एक आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार आणि मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यावर ब्रेक स्वत: अजित पवार यांनीच लावले आहे. त्यामुळे ते काही भाजपमध्ये जाणार नाहीत हे नक्की झालं आहे. एकीकडे त्यांनी स्पष्टीकरण दिलं असतानाही सत्ताधारी मात्र त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकताना दिसत आहेत. यावरूनच पत्रकारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विचारलं असता त्यांनी पॉझिटिव्ह वातावरणात अजून कुठला पॉझिटिव्ह बद्दल जर होणार असेल तर त्याचं स्वागत होईल असं म्हणत अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाला एकाअर्थी हिरवा कंदिल दिला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर बोलताना, त्यांनी फडणवीस यांचे कौतूक करताना, शासनाच्या कामाचा वेग हा चांगला दिसून येत असल्याचे म्हटलं आहे.