शिंदे गटाच्या मंत्र्याची थेट राहुल गांधींनाच ऑफर, घातली ‘ही’ अट, म्हणाले. तर…
शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केल्याने उलट सुलट चर्चांना उत येत आहे. यावेळी आम्ही काँग्रेस सोबत युती करायला तयार आहोत, मात्र राहुल गांधी यांना भगवा हातात घ्यायला सांगा असे त्यांनी म्हटलं आहे.
जळगाव : राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसापासून गायब अशी आरोळी उठवली जात आहे. यादोन्ही मुद्द्यावरून राज्यात चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केल्याने उलट सुलट चर्चांना उत येत आहे. यावेळी आम्ही काँग्रेस सोबत युती करायला तयार आहोत, मात्र राहुल गांधी यांना भगवा हातात घ्यायला सांगा असे त्यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही कधी बसू शकतो, हे कधीच होणार नाही असे त्यांनी म्हटलं आहे. तर याच्याआधीच उद्धव ठाकरेंना आम्ही सावध केलं होतं, की पुढे रेड झोन आहे. गाडी फेल होईल, जाऊ नका. आपण आता इथेच गाडी थांबवली पाहिजे रस्ता चुकीचा दिसतोय. पण काही त्यांना काही चुकीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर भेटले संजय राऊत सारखे अशी टीका राऊत यांच्यावर केली आहे.