अजित पवार मुख्यमंत्री होतील? प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘ते एक ना एक दिवस…’

| Updated on: Jul 27, 2023 | 2:09 PM

याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मागिल काही दिवसापासून ते मुख्यमंत्री होतील असं सांगितलं होतं. तर मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनीही अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदावरून भाष्य करताना भविष्यामध्ये अजित पवार हे मुख्यमंत्री व्हायला हवे अशी आमची भावना आहे. ते लवकरच मुख्यमंत्री होतील, असे म्हणाले होते.

मुंबई, 27 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत थेट सत्तेत अजित पवार गेले. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होतील असे राष्ट्रवादीतील अनेक नेते आता उघड उघड बोलत आहेत. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मागिल काही दिवसापासून ते मुख्यमंत्री होतील असं सांगितलं होतं. तर मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनीही अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदावरून भाष्य करताना भविष्यामध्ये अजित पवार हे मुख्यमंत्री व्हायला हवे अशी आमची भावना आहे. ते लवकरच मुख्यमंत्री होतील, असे म्हणाले होते. तर त्यांच्याआधी आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट मुख्यमंत्री पदावरून ट्विट केलं होतं. तर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीश्वरांची इच्छा असून तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील असेही म्हटलं होतं. यामुळे राज्यात सध्या गोंधळाचे वातावरण असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदावरून मोठं वक्तव्य केलं आहे. पटेल यांनी, अजित पवार हे आज नाही तर उद्या मुख्यमंत्री होती. काम करणाऱ्याला संधी मिळतेच त्यांनाही मिळेल असेही त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता भाजपकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 27, 2023 02:09 PM
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा विशेष ब्लॉक, काय कारण? वाहनांना पर्याय कोणता?
“राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये आग लावली,” स्मृती इराणी यांच्या आरोपावर काँग्रेस महिला आमदार भडकली; म्हणाली…