अजित पवारांवर नंतर बोलू ‘आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा’- रुपाली पाटील

| Updated on: Jan 02, 2023 | 4:58 PM

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केलं होतं तेव्हा भाजपववाले कुठे होते असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी केला आहे

विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर विधान केलं. ज्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. तर अजित पवार यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. तसेच अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखिल होत आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते असे विधान केलं होतं. याचदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी, यावेळी अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप नेत्यांसह शिंदे गटावर देखील हल्लाबोल केला आहे. तसेच अजित पवार यांचे विधान बरोबर असल्याचेही पाटील म्हणाल्या.

त्याचबरोबर राज्यपाल यांनी जेव्हा वक्तव्य केलं होतं तेव्हा हे भाजपववाले कुठं गेले होते असा सवाल उपस्थित केला. तर राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केलं होतं तेव्हा भाजपववाले कुठे होते.

Published on: Jan 02, 2023 04:30 PM
Ramdas Athawale : त्यांच्या एकत्र येण्याणे फार परिणाम होणार नाही, आमची ताकद मोठी आहे – रामदार अठवले
J. P. Nadda on Uddhav Thackeray | भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका