सुप्रिया सुळे घालणार अजितदादांना हार, खोचक टीका की खरंच करणार अभिनंदन?
सुप्रिया सुळे अमरावतीत आल्या आणि अजित पवार अमरावतीत आले की तेच कार्यकर्ते कसे हे मला समजत नाही असा टोला खासदार अनिल बोंडे यांनी लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना ते दिल्लीला आल्यावर मी त्यांना समजावून सांगेन असे खोचक उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.
नांदेड : 5 ऑक्टोबर 2023 | फडणवीस यांनी पवारांच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झाले असे विधान केलंय त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी रोज शरद पवारांना नावे ठेवावी मात्र नांदेड यथे योग्य उपचार द्यावा. संभाजीनगर, ठाणे येथील प्रकार थांबवावे मग खुशाल शरद पवारांना नाव ठेवावं असे त्या म्हणाल्या. फडणवीस यांनी अजित दादा यांना 5 वर्षासाठी cm करायचे विधान केले. त्यांच्या या विधानाचे मी स्वागत करते. अजितदादा मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार मी घालेन, असा टोला त्यांनी लगावला. इथे हाडाचे जे भाजप नेते आहेत त्यांचे हाल झाले. परंतु, भाजपला ज्या कॉंग्रेसला संपवायचे होते त्यांचेच नेते आता पहिल्या पंक्तीला बसले आहेत याचा आनंद होतोय, असे त्या म्हणाल्या.
Published on: Oct 05, 2023 07:18 PM