“पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच,” अमोल कोल्हे, धनंजय मुंडे यांनी केला निर्धार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापनदिन काल मुंबईत साजरा झाला. या कार्यक्रमातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधीत केले. राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमातून पक्षाच्या नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच करायचा असा निर्धार केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापनदिन काल मुंबईत साजरा झाला. या कार्यक्रमातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमातून पक्षाच्या नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच करायचा असा निर्धार केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अमोल कोल्हे यांनी “पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असला पाहिजे यासाठी आतापासूनच कंबर कसूया”, असं वक्तव्य केलं आहे. तर आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, “येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा झाला पाहिजे यासाठी संकल्प करूया.” राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या या विधानानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.