अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराचे थेट आरोप? आरोपानंतर एकच खळबळ

| Updated on: Jul 05, 2023 | 12:47 PM

तर शरद पवार यांना पाठिंबा द्यायचा की अजित पवार यांच्याबरोबर जायचं असा प्रश्न अनेकांच्या समोर उभा आहे. तर अजित पवार यांनी आपल्याला सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली. तसेच त्यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत आता दोन गट तयार झाले आहेत. तर आमदारांना पाठिंबा कोणाला द्यायचं हा प्रश्न समोर उभा आहे. तर शरद पवार यांना पाठिंबा द्यायचा की अजित पवार यांच्याबरोबर जायचं असा प्रश्न अनेकांच्या समोर उभा आहे. तर अजित पवार यांनी आपल्याला सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शिरुरचे आमदार अशोक पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आमदार अशोक पवार यांनी आमच्या खोट्या सह्या घेण्यात आल्या असा आरोप अजित पवार यांच्यावर केला आहे. याचदरम्यान ते शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादीचं हे भांडण आता केंद्रीय निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील गेलं आहे.

Published on: Jul 05, 2023 12:47 PM
अजित पवार यांच्या बंडानंतर इम्तियाज जलील यांचं जनतेला आवाहन, “आता तरी विचार करा…”
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं का? अंबादास दानवे यांचं मत काय?