पवारांचा मास्टर हा ट्रोक, अजित पवार यांच्या चलबिचलपनाला ब्रेक; शिवसेना नेत्याचा भाजप प्रवेशावरून निशाना
राष्ट्रवादीसह दुसऱ्या पक्षाचे नेते शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्याला म्हणून मनधरणी करत होते. मात्र शरद पवार आपल्या मतावर ठाम होते. आज याबाबत कोअर कमिटीची बैठक पार पडली आणि पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला.
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नाराजीनाट्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं होतं. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गल्ली ते दिल्ली असा कार्यकर्ता हो रस्त्यावर उतरला होता. तर राष्ट्रवादीसह दुसऱ्या पक्षाचे नेते शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्याला म्हणून मनधरणी करत होते. मात्र शरद पवार आपल्या मतावर ठाम होते. आज याबाबत कोअर कमिटीची बैठक पार पडली आणि पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्यावरून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. यावरूनच शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, राज्यात रंगलेल हे नाट् म्हणजे शरद पवार यांचा हा पावर गेम असल्याचं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीत अंतर्गत जो कलह होता तो थांबविण्यासाठी पवार यांनी हा मास्टरस्ट्रोक मारल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर आता अजित पवार यांच्यासह जे राष्ट्रवादीत किलबील करणारे होते. त्यांच्या चलबिचलपनाला ब्रेक बसला आहे. आता शांत बसणे हा एकमेव पर्याय आहे, राष्ट्रवादीतली चलबिचल आता शांत होईल असेही शिरसाट यांनी म्हटलं आहे.