शिवसेना नेत्यावर नारायण राणे चांगलेच संतापले? म्हणाले, ‘ राउत पागल हो गया है, अपनी सोच…’
उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटासह भाजप निशाना साधताना टीका केली होती. तर शिंदे गटाचे 16 आमदार हे अपात्र होणार म्हणूनच राष्ट्रवादी फोडण्यात आल्याचं तर लवकरच अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील असा गौप्यस्फोट केला होता.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडाळीमुळे महाविकास आगाडीच तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर अजित पवार यांनी 30 ते 40 आमदार घेत वेगळी चुल मांडली आहे. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटासह भाजप निशाना साधताना टीका केली होती. तर शिंदे गटाचे 16 आमदार हे अपात्र होणार म्हणूनच राष्ट्रवादी फोडण्यात आल्याचं तर लवकरच अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील असा गौप्यस्फोट केला होता. त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार हल्ला केला. यावेळी राणे यांनी, राऊत वेडे झाले आहेत. तर एकनाथ शिंदे हेच 2024 मध्येही मुख्यमंत्री राहतील असं म्हटलं आहे. तर राऊत यांनी त्यांच्या पक्षाचा विचार करावा, असे त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Jul 04, 2023 08:56 AM