JALGAON | राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील डायरेक्ट चंद्रकात पाटलांना भिडले
राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळे डुप्लीकेट आमदार निवडून आलेला असून या डुप्लीकेटाला राष्ट्रवादीने मदत केली नसती तर तो निवडून आला नसता, अशा शब्दात अनिल भाईदास पाटील यांनी नाव न घेता शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांनी शिंदे गटात जाऊन बंडखोरी केली आहे. त्यातील चार ओरिजनल तर एक डुप्लीकेट असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी नाव न घेता मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळे डुप्लीकेट आमदार निवडून आलेला असून या डुप्लीकेटाला राष्ट्रवादीने मदत केली नसती तर तो निवडून आला नसता, अशा शब्दात अनिल भाईदास पाटील यांनी नाव न घेता शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
Published on: Aug 28, 2022 09:44 PM