Chhagan Bhujbal | ‘पांढऱ्या दाढीचा देशावर प्रभाव आहे’-tv9

| Updated on: Aug 18, 2022 | 1:52 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ म्हणाले, पांढऱ्या दाढीचा देशावर प्रभाव आहे. ज्यामुळे सभागृहात वातावरण हलके पूलके झाले

राज्याचे अधिवेशन हे विरोधकांच्या विरोधाने गाजत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्या एका वाक्याने मात्र सभागृहात वातावरण हलके पूलके झाले. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, एका चर्चेदरम्यान भुजबळ यांनी दाढीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिमटा काढला. ते म्हणाले, मला मुख्यमंत्र्यांकडे बघून खूप आनंद झाला आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री झालात यासोबतच मला आनंद वेगळाच आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. सफेद दाढीचा प्रभाव हा हिंदुस्तान भर आहे, असं भुजबळ म्हणताच सभागृहातील इतर सदस्यांनी त्याला हसून दाद दिली!

Published on: Aug 18, 2022 01:37 PM
Uday Samant | विरोधकांना महाराष्ट्राचा कळवळा आहे असं दाखवायचंय, म्हणून अशी वक्तव्य- tv9
Pratap Sarnaik | विरोधकांच्या घोषणाबाजीवर प्रताप सरनाईकांची परखड प्रतिक्रिया- tv9