तेरे लष्कर के मुकाबल अकेला हूं में मगर…

| Updated on: Sep 01, 2022 | 9:19 AM

तेरे लष्कर के मुकाबल अकेला हूं में मगर हा शेर सुनावत त्यांनी आपल्या आयुष्यातील संकटं काय होती आणि ती कशी आली हेही त्यांनी यावेळी सांगितले. 

नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या संकट काळात 56 हजार कुटुंबीयांनी केलेल्या मदतनीविषयी माहिती देताना नाथ प्रतिष्ठानचे सामाजिक योगदानाविषयीही माहिती दिली. त्यांनी यावेळी सांगितले की, येथील जनतेच्या विश्वासामुळेच बीड, आंबेजोगाई  परिसरातील नागरिकांना मदत करता आली. कोरोना संकटाच्या कार्यकाळात जगावर संकट ओढावलेले असताना तसेच संकट देशावर आणि राज्यावर आले होते, मात्र या संकट काळात नाथ प्रतिष्ठान नागरिकांच्या मदतीला धाऊन गेले. या प्रकारची कामं करत असताना आपल्यावरही संकट आली मात्र आपण डगमगलो नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. तेरे लष्कर के मुकाबल अकेला हूं में मगर हा शेर सुनावत त्यांनी आपल्या आयुष्यातील संकटं काय होती आणि ती कशी आली हेही त्यांनी यावेळी सांगितले.

Published on: Sep 01, 2022 09:19 AM
Dhananjaya Munde : माझ्या जीवनात संघर्ष पाचवीला पूजलेला, धनंजय मुंडे असं का म्हणाले?
वीज कोसळून नारळाच्या झाडाने घेतला पेट