“गौतमी पाटील हिने पाटील नाव केलं तर तुमचं काय बिघडलं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
तिच्या नृत्यामुळे तिचे चाहत्यांची संख्या ही दिवसागणित वाढतच आहे. मात्र जशी ती फेमस होत आहे. तशीच ती वादात ही सापडत आहे. तिच्या अनेक कार्यक्रम आयोजकांवर गुन्हे नोंद झाले आहेत. तर तिच्यामुळे अनेकांना पोलिसांकडून चांगलाच प्रसाद खायला मिळाला आहे.
खेड : सबसे कातील गौतमी पाटील तिच्या अभिनयासह, सौंदर्य आणि नृत्यानं अनेक तरूणांसह महिलावर्गालाही भूरळ घालत आहे. तर तिच्या नृत्यामुळे तिचे चाहत्यांची संख्या ही दिवसागणिक वाढतच आहे. मात्र जशी ती फेमस होत आहे. तशीच ती वादात ही सापडत आहे. तिच्या अनेक कार्यक्रम आयोजकांवर गुन्हे नोंद झाले आहेत. तर तिच्यामुळे अनेकांना पोलिसांकडून चांगलाच प्रसाद खायला मिळाला आहे. मात्र तिची काही लोकप्रियता कमी झालेली नाही. आता तिच्या आडनावावरून नवा वाद उभा राहिला आहे. यावरून तिला धमकावण्यात येत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे काही बडे नेते तिच्या बाजूने ठाम आहेत. खासदाक अमोल कोल्हे यांनी तिची बाजू धरली आहे. तर खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी वेळीच स्वत:ला आवर घाला असा इशारा दिला आहे. तसेच तमी पाटील हिने पाटील नाव केलं तर तुमचं काय बिघडलं? तुम्ही तिला का ट्रोल करताय हे मला कळत नाहीय. ती नवीन कलाकार आहे असं म्हटलं आहे.