हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ; निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाड यांना ED चा समन्स, आज होणार चौकशी
गेल्या दोन दिवसांपुर्वीच ईडीने पुण्यात कारवाई करत पुण्यातील बड्या व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी केली होती. यावेळी सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांवर छापेमारी सुरू केल्यानं पुणे शहर हादरून गेलं होतं
पुणे : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमीरा थांबताना दिसत नाही. गेल्या दोन दिवसांपुर्वीच ईडीने पुण्यात कारवाई करत पुण्यातील बड्या व्यावसायिकांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी केली होती. यावेळी सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांवर छापेमारी सुरू केल्यानं पुणे शहर हादरून गेलं होतं. त्यानंतर ही छापेमारी मुश्रीफ यांच्याशी संबंधीत असल्याचे समोर आले होते. त्यावेळी वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक आणि मुश्रीफ यांचे निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाड यांच्या घरासह कार्यालयावर छापेमारी करण्यात आली होती. यानंतर चंद्रकांत गायकवाड यांना सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावला आहे. आज बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितलं आहे.
Published on: Apr 05, 2023 10:29 AM