मुश्रीफा यांच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या या नेत्याला एसीबीची नोटीस
साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला नोटीस पाठवण्यात आली असून त्यांना २० मार्च रोजी चौकशी केली जाणार आहे.
मुंबई : मविआमधील अनेक नेते सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले दिसत आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई करत चौकशी केली. त्यांची 8 तास चौकशी ईडीने केली. त्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेत्याच्या परिवाला एसीबीच्या समोर जाण्याची वेळ आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोटीस पाठवली आहे. ही नोटीस चौकशीसाठी पाठविण्यात आली आहे. साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला नोटीस पाठवण्यात आली असून त्यांना २० मार्च रोजी चौकशी केली जाणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. याआधी तीन वेळा साळवी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे साळवी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
Published on: Mar 16, 2023 12:25 PM