राष्ट्रवादीच्या नेत्यांवर रोहित पवार संतापले, ज्यांनी मोठं मोठी पदे भूषवली ते…

| Updated on: Jun 06, 2023 | 8:03 PM

विकासाचा मुद्दा दिसत नाही तेव्हा जाती धर्मात वाद वाढवायचे प्रयत्न करतात. जेव्हा दंगल होते तेव्हा राजकीय पक्षांना होतो पण सामान्य लोकांना त्याचा फटका बसतो. आज काल काही नवीन नेते महाराष्ट्रात तयार झाले आहेत.

पुणे : भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. मात्र, त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावर अपेक्षित प्रतिक्रिया न दिल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार चांगलेच संतापले आहेत. त्यांनी स्वपक्षीय नेत्यानाच खडे बोल सुनावले आहेत. हे सरकार नुसते घोषणा करणारे आहे. जे आहेत त्यांना मंत्री पद सोडायचे नाही आणि नवीन मंत्री पद द्यायचे नाहीत. विकासाचा मुद्दा दिसत नाही तेव्हा जाती धर्मात वाद वाढवायचे प्रयत्न करतात. जेव्हा दंगल होते तेव्हा राजकीय पक्षांना होतो पण सामान्य लोकांना त्याचा फटका बसतो. आज काल काही नवीन नेते महाराष्ट्रात तयार झाले आहेत. खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. भाजपचे काही स्वघोषित नेते खालच्या पातळीवर बोलतात. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. पण, ज्या नेत्यांनी पदे भूषवली ते काहीच बोलत नाहीत असा संताप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. फक्त अजित दादा यांनी प्रतिक्रिया दिली. पवार साहेबांनी अनेक नेते मोठे केले. जे आमच्या पक्षात आहेत आणि इतर पक्षात आहे त्यांनीही असे राजकारण कोणी करत असेल तर विचार करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.

Published on: Jun 06, 2023 08:03 PM
“असं वाटतं मीच युवासेनेचा जिल्हाप्रमुख”, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना टोला
निसर्गाच्या लहरीपणावर मात, नंदूरबारच्या शेतकऱ्याची कमाल, का होतेय चर्चा?