काय चौकशी करा मी घाबरत नाही; रोहित पवारांनी नाव घेत ठणकावलं
परवानगी न घेता १५ ऑक्टोबरपूर्वीच ऊस गाळपासाठी ॲग्रो लिमिटेड साखर कारखाना सुरू करण्यात आल्याची तक्रार शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे
मुंबई : माजी मंत्री आणि भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. परवानगी न घेता १५ ऑक्टोबरपूर्वीच ऊस गाळपासाठी ॲग्रो लिमिटेड साखर कारखाना सुरू करण्यात आल्याची तक्रार शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. त्यावर, काय चौकशी करायची ती करा. मी घाबरत नाही, अशी रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ॲग्रो लिमिटेड साखर कारखान्यासंदर्भात तक्रार करून खूप काही त्यांनी अचिव केलं का? खूप काही त्यांना मिळालं का? रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई झाली तर त्यांनी जावं आणि फटाके वाजवावे, मजा करावी. जे काय करायचं ते तुम्ही करा पण आम्ही राम शिंदे यांच्या कारवाईला कुठेही घाबरत नाही, असं ते म्हणाले.
Published on: Mar 10, 2023 11:20 AM