Amol Kolhe on Nitesh Rane : अमोल कोल्हे यांनी काढली नितेश राणे यांची उंची, म्हणाले...  ते कोण आणि सध्या
Image Credit source: tv9

Amol Kolhe on Nitesh Rane : अमोल कोल्हे यांनी काढली नितेश राणे यांची उंची, म्हणाले… ते कोण आणि सध्या

| Updated on: Jan 12, 2023 | 11:46 AM

वर्धा येथील एका कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी अभिनेता खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी नितेश राणे यांची उंचीच काढली आहे.

पुणे : भाजप आमदार नितेश राणे ( NITESH RANE ) यांनी कोण तो कोल्हे, छत्रपती शिवाजी महाराजांची ( CHTARPATI SHIVAJI MAHARAJ )  भूमिका करण्यासाठी पैसे घेतात. अशी टीका राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP AMOL KOLHE) यांच्यावर केली होती. त्यावर पलटवार करताना अमोल कोल्हे यांनी ‘ते कोण आहेत आणि सध्या कोणत्या पक्षात आहेत’ अशी खिल्ली उडविली आहे.

ते जे काही बोलले ती भाजप पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? जर नसेल तर पक्षच त्यांच्या वक्तव्याला किमंत देत नाही त्यांच्याविषयी काय बोलावे? वडिलांच्या कष्टावर आणि कर्तृत्वावर ते स्वतःच्या पोळ्या भाजतात. अशा व्यक्तींना बोलण्यातून माणसाची संस्कृती दिसते या गोष्टीचा विचार त्यांनी करावा.

ज्यांची स्वतःची उंची असेल, स्वतःचे काही कर्तृत्व असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास घरोघरी पोहोचविण्यात ज्याचे काही योगदान असेल अशा व्यक्तींवर बोलणे मला जास्त उचित वाटते, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी नितेश राणे यांना फटकारले आहे.

 

Published on: Jan 12, 2023 11:46 AM
Ssc-hsc exma : कॉपी कशी रोखायची, आता बोर्डाला द्या तुमच्या सुचना
UDDHAV THACKERAY : उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ, पक्षानंतर आता ‘मशाल’ही वादात