भाजपा आणि मित्रपक्ष कॉंग्रेसमय झाली आहे, सुप्रिया सुळे यांची बोचरी टीका

| Updated on: Jan 14, 2024 | 3:42 PM

दक्षिण मुंबई मतदार संघातील लोकसभा जागेवर दावा करणाऱ्या मिलिंद देवरा यांनी अखेर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपा आणि मित्रपक्ष कॉंग्रेसमय झाल्याची झोंबरी टीका केली आहे. भाजपात टॅलेंटच उरलेले नाही की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाचा झेंडा इतकी वर्षे खांद्यावर घेणाऱ्या, सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल दया येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुणे | 14 जानेवारी 2024 : भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष कॉंग्रेसमय झाली आहे अशी बोचरी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याबद्दल त्यांना प्रतिक्रीया व्यक्त केली असता खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की आपल्या मिलिंद देवरा यांना शुभेच्छा आहेत. परंतू भाजपा आणि मित्र पक्ष कॉंग्रेसमय झाले आहेत. भाजपात काही टॅलेंटच उरलेले नाही की काय अशी परिस्थिती आहे. ज्या कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा इतकी वर्षे खांद्यावर फडकला आणि वर्षानुवर्षे सतरंज्या उचलल्या त्या कार्यकर्त्याचं काय असा सवालही त्यांनी यावेळी केला. नारायण राणे यांनी शंकराचार्यांबद्दल वक्तव्य केले आहे, त्याबद्दल भाजपाला राणेचे वक्तव्य मान्य आहे काय ? हे त्यांनी स्पष्ट करावे असेही सुळे यांनी म्हटले आहे. बीड येथील कार्यक्रमात मुंडे कुटुंबाला संपूर्ण दूर केल्याने भाजपा गोपीनाथ मुंडे यांनी विसरली असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 14, 2024 03:42 PM
मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात जो बोलेल त्याला सोडणार नाही, जरांगे पाटील यांनी सुनावले
कॉंग्रेसवाले आणि भाजपावाले दोघेही मिलींद देवरांची जिरवतील, विजय वडेट्टीवार यांची टीका