बुलढाणा लक्झरी बस अपघातावर सुळे यांनी व्यक्त केला शोक वाहिली श्रद्धांजली; टि्वट करत केली ‘ही’ मागणी
राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या भावना बोलून दाखवत मृतकांना श्रद्धांजली वाहिली. तर शोक व्यक्त करत सरकारकडे मागणी केली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे
पुणे : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला. सिंदखेडराजा परिसरात झालेल्या अपघातात लक्झरी बस उलटली. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या भावना बोलून दाखवत मृतकांना श्रद्धांजली वाहिली. तर शोक व्यक्त करत सरकारकडे मागणी केली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी शोक व्यक्त करताना, सिंदखेडराजा, जि. बुलढाणा परिसरात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटली. या अपघातात काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. हि बातमी अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली असे त्यांनी म्हटलं आहे. तर या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा खासगी बसच्या वेगावरील कायदेशीर नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा ही विनंती.