मलिकांना तारीख पे तारीख, कारागृहातील मुक्कामही वाढला

| Updated on: Mar 15, 2023 | 3:02 PM

नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने आधीच मान्य केलं आहे. मात्र त्यांना जामीन मिळालेला नाही

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीनाच्या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे मलिकांचा कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला आहे. नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने आधीच मान्य केलं आहे. मात्र त्यांना जामीन मिळालेला नाही. आज त्यांच्या जामीनावर सुनावणी होईल असे अपेक्षीत होते. मात्र सुनावणी झालेली नाही. आता त्यांच्या जामीनावर पुढील सुनावणी 20 मार्चला होणार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना तारीख पे तारीख मिळत असल्याचेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी मलिक अटकेत आहेत.

Published on: Mar 15, 2023 03:02 PM
… तर स्वतःची पेन्शन द्यायला तयार : भरत गोगावले
पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं काम अंतिम टप्प्यात; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी