शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? ‘या’ आमदाराने वर्तविले भविष्य

| Updated on: Sep 22, 2023 | 8:51 PM

पवार कुटुंब विखुरलेले आहे. ते एकत्र यावे अशी इच्छा आहे. अजित पवार यांनी मोदी यांचे विकासाचे काम पुढे नेण्यासाठी सोबत येण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे शरद पवार यांनीही देशहितासाठी पुढे यावे. काही दिवसात ते मोदी यांच्यासोबत दिसतील.

मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | लालबागच्या राजाला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच आहे. त्याचसोबत सेलेब्रिटी आणि राजकारणी नेतेही लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती आमदार रवी राणा यांनी आज लाल बागच्या राजायचे दर्शन घेतले. यानंतर प्रसार मध्य्मास्न्ही बोलताना खासदार नवनीत राणा यांनी ‘आम्ही दरवर्षी दर्शनाला येतो. लालबाग राजाचे दर्शन घेतल्याशिवाय गणेशोत्सव पूर्ण होत नाही, असे म्हटले. महिला आरक्षण बिल संसदेत आले त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदी यांनी आता महिलांना अधिकार दिला असे त्या म्हणाल्या. तर, आमदार रवी राणा यांनी अजित पवार हे जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन पाहून सोबत आले तसेच शरद पवार हे सुद्धा मोदी यांच्यासोबत येतील. देशहितासाठी ते पुढे येतील आणि हा चमत्कार नक्कीच होईल, अशी प्रतिक्रिया दिली.

Published on: Sep 22, 2023 08:51 PM
Cm Eknath Shinde यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास…, बच्चू कडू यांनी काय केलं मोठं वक्तव्य?
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित; पण, धरणे आंदोलन सुरूच, कुणी घेतला निर्णय?