राज्यपालांच्या ‘त्या’ मागणीवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले महाराष्ट्राची सुटका…
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपली राज्यपाल पदावरून मुक्तता करण्यात यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या या पत्रावरून शरद पवार यांनी आज प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar ) यांनी सीमावाद आणि राज्यपाल कोश्यारी यांच्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. सीमावादाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात सुरु आहे. सीमावाद भागातही जनतेच्या काही मागण्या आहेत त्या जाणून घेतल्या. त्याबद्दल महाराष्ट्रात मतभिन्नता नको. मुख्यमंत्री यांच्याकडे मी त्याबाबत चर्चा करणार आहे. राज्य सरकार हा प्रश्न निश्चित गांभीर्याने घेईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविले आहे. ते पंजाबचे राज्यपाल होतील अशी चर्चा आहे. तशी चर्चा मी ऐकली आहे पण, त्यात एक चांगली गोष्ट आहे की आताचे जे राज्यपाल आहेत त्यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका होईल.
Published on: Jan 28, 2023 11:39 AM