मणिपूर घटनेचे तीव्र पडसाद पुण्यात, राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे. पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादीचं आंदोलन सुरु आहे.
पुणे, 22 जुलै 2023 | मागील दोन महिन्यापासून मणिपूर येथे हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व घटनेदरम्यान दोन महिलांवर अत्याचार करण्यात आला. त्यांची निर्वस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान मणिपूर घटनेवरून राज्यात काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीही आक्रमक झाल्याची दिसत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे. पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादीचं आंदोलन सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Published on: Jul 22, 2023 12:24 PM