मुंबईत NCP कार्यालयाबाहेर आज दिवाळी, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, शरद पवार, शरद पवार

| Updated on: May 05, 2023 | 1:45 PM

प्रफुल्ल पटेल यांनी फक्त तीन ओळीचं निवेदन सादर केलं. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील असं पटेल यांनी जाहीर केलं. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे.

मुंबई : राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळून लावण्यात आला. तसेच शरद पवार हेच अध्यक्ष राहतील असा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी फक्त तीन ओळीचं निवेदन सादर केलं. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील असं पटेल यांनी जाहीर केलं. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे शरद पवार वगळता राष्ट्रवादी असे चित्र कधीच भविष्यात दिसणार नाही हे मात्र नक्की झालं आहे. तर पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता. हा राजीनामा एकमताने नामंजूर करून त्यांनाच अध्यक्ष म्हणून एकमताने निवडण्यात येत असल्याचं पटेल यांनी सांगितलं. यामुळे NCP कार्यालयाबाहेर गेले तीन दिवस आंदोलनावर बसलेले कार्यकर्त्यांसह राज्यभरातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. NCP कार्यालयाबाहेर तर आज दिवाळी साजरी केली जात आहे. तर शरद पवार, शरद पवार अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला जात आहे.

Published on: May 05, 2023 01:45 PM
राज ठाकरे यांनी पांढऱ्या कागदावर कोणाला आणत दोनच शब्दात टोमणा मारला?
आले… पण मुख्यमंत्री म्हणून नाही; काँग्रेस नेत्याचा फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका