नात असलं तरिही, राजकारणात…; राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांना डिवचलं

| Updated on: May 04, 2023 | 9:25 AM

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला होता, अशी चर्चा आहे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ज्यामुळे कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांमध्येच अस्वस्थता दिसत आहे. यातच यामागे ईडी आणि अजित पवार आणि त्यांच्या गटाची वेगळी भूमिका असे कारण असल्याचे आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. त्यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला होता, अशी चर्चा आहे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी आपण त्यावरच प्रश्नचिन्ह उभा केला. त्यावर अजित पवार हे वारंवार म्हणतात मी राष्ट्रवादी सोडणार नाही. त्यांनी या अफवांना पुर्णविराम लावायला हवा. पवार कुटुंबियाचं नातं फार घट्ट आहे. मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं, असं म्हणत राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उभा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे.

Published on: May 04, 2023 09:25 AM
अवकाळीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला, बळीराजाला मोठा फटका, पीकं उद्धस्त
तर बेळगावात या, महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करा; संजय राऊत यांचं थेट आव्हान