Jitendra Awhad : कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; मारहाण प्रकरणावर आव्हाडांचं ट्विट
कराड - गीते मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडने हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला असल्याचं म्हंटलं आहे.
जेलमधला मारहाणीचा वाद वाल्मिक कराड याने जाणीवपूर्वक घडवून आणला, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं आहे. वाल्मिक कराड याच्या टोळीचे जवळपास 70 ते 80 गुन्हेगार सध्या बीड कारागृहात असल्याचं देखील यावेळी आव्हाड म्हणाले आहेत. गेल्या 3 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे.
आज सकाळी बीड कारागृहात झालेल्या वाल्मिक कराड आणि महादेव गीते यांच्यात मारहाण झाली. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गीते याच्या टोळीने मारहाण केली आहे. यानंतर महादेव गीतेसह 4 आरोपींना तत्काळ बीड कारागृहातून हलवण्यात आलं. यासंपूर्ण प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना वाल्मिक कराड यानेच जाणीवपूर्वक हा संपूर्ण डाव घडवून आणल्याचं म्हंटलं आहे.
Published on: Mar 31, 2025 11:15 PM