भाकरी फिरणार? राष्ट्रवादीत होणार बदल? घरातील पदाबाबत अजित पावर यांनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: May 21, 2023 | 7:11 AM

त्यानंतर या भाकरी प्रकरणाला आता चांगलाच वेग आला आहे. यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील काल कोल्हापूर येथे पुन्हा याचा उल्लेख केला ज्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या भाकरी फिरवण्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. स्वत: शरद पवार यांनी याबाबत कल्पना दिली होती. तर आपल्याच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या भाकरी प्रकरणाला आता चांगलाच वेग आला आहे. यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील काल कोल्हापूर येथे पुन्हा याचा उल्लेख केला ज्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी अजित पवार यांनी कोणत्याही मतदारसंघावर कुणाचीही मक्तेदारी नाही. बूथनिहाय नियोजन करून काम केल्यास कुठल्याही मतदारसंघातून कुणीही निवडून येऊ शकतो. विविध संघटनांमध्ये काम करण्यास युवकांना मोठी संधी आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत भाकरी फिरविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आमच्यापासूनच करण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले. आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपासून भाकरी फिरविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तर आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत भाकरी फिरविण्याची काम करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या झालेल्या बैठकीत काही निर्णय झाले. त्यात आमच्यापासून भाकरी फिरविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

‘जे आडवे येतील, आता त्यांना सरळ करणार’, राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले…
‘…तर ऑक्टोबरमध्येच लोकसभा निवडणुका लागतील’, प्रकाश आंबेडकर यांनी दिला संकेत