राजीनामा दिल्यास अजित पवारांचा सुर बदलेल, म्हणतील, ‘ए गप बस रे’, या भीतीनेच; राज ठाकरेंकडून नक्कल करत टीका

| Updated on: May 07, 2023 | 7:23 AM

परंतु अजित पवार त्या दिवशी जे वागले ते पाहून शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला. प्रत्येकाला बोटांच्या सहाय्याने हाक मारली जात होती. गप्प करत होते.

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला तो मागे ही घेतला. पण त्यावर राज्यात जे झालं त्यावरून अनेकांनी आप आपल्यापद्धतीने कारणांचा अंदाज लावू पाहतोय. अनेक नेत्यांनी यावर भाष्य केलं. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं. राज ठाकरे आज सध्या रत्नागिरी दौऱ्यावर होते. रत्नागिरीत त्यांची मोठी जाहीर सभा झाली. या सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी पवारांच्या राजीनामा नाट्याचा उल्लेख केला. राज ठाकरे म्हणाले. मला असं वाटतं, शरद पवारांना (Sharad Pawar) खरंच राजीनामा द्यायचा होता. परंतु अजित पवार त्या दिवशी जे वागले ते पाहून शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला. प्रत्येकाला बोटांच्या सहाय्याने हाक मारली जात होती. गप्प करत होते. ‘अरे तू गप्प बस’, ‘अरे थांब.’ शरद पवारांच्या लगेच लक्षात आले की उद्या अजित पवारही त्यांना म्हणू शकतात- अरे गप्प बस.

पवारांच्या तोंडून कधीही छत्रपती शिवरायांचं नाव नाही; राज ठाकरेंची टीका
‘म्हणून उद्धव ठाकरे यांना खाली खेचलं आणि शिवसैनिकाला त्या खुर्चीवर बसवलं’, शिवसेना नेत्याचा घणाघात