पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; म्हणाले, जे 50 आमदार…

| Updated on: Apr 24, 2023 | 3:03 PM

याचमुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी, शरद पवार काय बोलले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांचा आघाडीचा प्रश्न आहे. पण उद्धव ठाकरे हे ज्याप्रमाणे वागत आहेत त्यावरून महाविकास आघाडी किती पुढे जाईल हा संभ्रम निर्माण झाला आहे.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी वक्तव्य केलं होतं. की आम्ही एकत्र लढणार वैगरेबद्दल बोलायचं झालं, तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलीच नाही. त्यामुळे यावर कसं सांगता येईल? असं म्हटलं होतं. त्यावरून राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चांना उत आला आहे. याचमुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी, शरद पवार काय बोलले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांचा आघाडीचा प्रश्न आहे. पण उद्धव ठाकरे हे ज्याप्रमाणे वागत आहेत त्यावरून महाविकास आघाडी किती पुढे जाईल हा संभ्रम निर्माण झाला आहे. तर जे उद्धव ठाकरे आपले 50 आमदार सांभाळू शकले नाही, पक्ष सांभाळू शकले नाही. ते महाविकास आघाडी कशी सांभाळणार, याची जाणीव कदाचित शरद पवार यांना झाली असावी, म्हणून 2024 च्या निवडणूकीबाबत ते बोलले असतील असा टोला लगावला आहे.

Published on: Apr 24, 2023 03:03 PM
BMC नं भांडुपला गाडी पाठवून ‘त्यांच्या’ जिभेची नसबंदी करावी, संजय राऊत यांच्यावर कुणाची जहरी टीका?
उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदीबाबत केलेल्या एकेरी उल्लेखावर एकनाथ शिंदे म्हणाले…