राष्ट्रवादीत अध्यक्षांचा राजीनामा, जुंपली मात्र राऊत आणि पटोले यांच्यात? काय कारण?
तिकडे राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरू असतानाच बड्या नेत्यांमध्ये मात्र नाराजीनाट्य पहायला मिळत आहेत. तर इकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरात वाद होताना दिसत आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे. तिकडे राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरू असतानाच बड्या नेत्यांमध्ये मात्र नाराजीनाट्य पहायला मिळत आहेत. तर इकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटात जोरात वाद होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असले तरिही निर्णय राहूल गांधी (Rahul Gandhi) घेतात असं म्हटलं होतं. त्यावरून नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राऊत हे काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. त्यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल बोलून चोमडेगिरी करू नये, असा थेट इशारा देत राऊत यांना टोला लगावला आहे. तर त्यांच्या या टीकेला राऊत यांनी पटलवार करत, अहो ते नाना पटोले आहेत. काय इतकं गांभिर्यानं घ्यायचं त्या माणसाला? त्यांचाच पक्ष त्यांना गांभिर्यानं घेत नाही. मी याबाबत राहुल गांधी यांच्याशी चर्चा करेन. तर पटोलें पेक्षा राहुल गांधी माझ्याशी जादा बोलतात असा टोला लगावला आहे.