नाना पटोलेंना राऊतांनी सुनावलं; म्हणाले, त्यांच्याकडे कोणाचा रेडिओ?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत मात्र निर्णय राहुल गांधींच घेतात असे वक्तव्य केलं. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे. त्यातच आता महाविकास आघाडी टिकणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान आता एका प्रकरणावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावानिर्माण होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी संजय राऊत हे काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. त्यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल बोलून चोमडेगिरी करू नये. असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. त्यांच्या या टीकेला राऊत यांनी पलटवार केला आहे. त्यांच्या पक्षाविषयी शरद पवारांनी भूमिका मांडली. ते ही त्यांच्या पुस्तकात. त्यांनी त्यांच्यावर बोलायला पाहिजे. शिवसेनेला कधीही अशा प्रकारची भूमिका घेतली नाही. आपण महाविकास आघाडीमध्ये आहात आपण आपल्या तोंडावर बंधन घाला. तुमच्याविषयी आम्ही बोलायला लागलो तर चोंबडे कोण आणि चाटू कोण हे कळेल. तर कालच्या सभेत आम्ही भेटलो होतो. ते काहीच बोलले नाहीत. पण आता बाहेर असं बोलत आहेत. तर काँग्रेस पक्षाविषयी कोणते विधान आम्ही केलेलं नाही. ते नक्की कोणाचं ऐकून बोलतात, त्यांच्याकडे कोणाचा रेडिओ आहे हे मला माहिती नाही.