पवार यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत अलर्टमोडवर; म्हणाले, आत्ताच बोलणं झालं, … असं मला कधी वाटलं नाही
आम्ही एकत्र लढणार वैगरेबद्दल बोलायचं झालं, तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलीच नाही. त्यामुळे यावर कसं सांगता येईल? असं शरद पवार यांनी विधान केलं होतं
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीवर वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. पवार यांनी अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी विधान करताना, आम्ही एकत्र लढणार वैगरेबद्दल बोलायचं झालं, तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलीच नाही. त्यामुळे यावर कसं सांगता येईल? असं म्हटलं होतं. त्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी राऊत यांनी, अनेकदा त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेतोय? तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठी. तर मविआच्या उभारणीत शरद पवारांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे मला अजिबात असं वाटत नाही की त्यांच्या बोलण्यावरून मविआ नसावी किंवा तुटावी. आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे.