मी राष्ट्रीय नेता नाहीये, त्यामुळे….; जयंत पाटील यांची नाराजी की स्पष्टीकरण?
बोलवण्यात आलेल्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित नव्हते. त्यावरून बैठकीबाबत काहीही माहिती नसल्याचे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सध्या राज्यातील राष्ट्रवादी नेत्यांत खळबळ उडाली आहे. तर कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहेत. यानिर्णयामुळे काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यातर डोळ्यात पाणी तरळले. मात्र यानंतर बोलवण्यात आलेल्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित नव्हते. त्यावरून बैठकीबाबत काहीही माहिती नसल्याचे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर मी राष्ट्रीय नेता नाहीये, त्यामुळे अशा बैठकांबाबत काही माहिती नव्हते असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर आजची बैठक ही राष्ट्रीय स्तरावरील बैठक आहे. पण कदाचित त्यांना या बैठकीबाबत मला सांगण्याची आवश्यकता वाटवी नसावी, सगळीकडे आपण असावचं असा आग्रह आपण पण करू नये, असे म्हणत जयंत पाटील यांनी सावध पवित्रा घेतला. तर पक्ष माझ्यावर आणि मी पक्षावर नाराज नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.