मराठा आरक्षणाची मागणी म्हणजे खाज आहे का? राष्ट्रवादीने सावंतांचा राजीनामाच मागितला….

| Updated on: Sep 26, 2022 | 3:33 PM

सत्तेचा, संपत्तीचा माज असलेल्या तसेच मानसिक रोगी असलेल्या या आरोग्य मंत्र्याचा तत्काळ राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अन्यथा रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दिला आहे.

मुंबईः तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांच्या टीकेनंतर केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. सत्तांतरानंतर विरोधकांना आरक्षणाची खाज सुटल्याचं वक्तव्य त्यांनी उस्मानाबादेत (Osmanabad) केलं. त्यावर मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनीही तानाजी सावंतांवरून मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय. ते म्हणाले, ‘ आरक्षणाची खाज सुटलीय का म्हणून मराठा आरक्षणाच्या मागणीला खाज या आजाराशी जोडून तानाजी सावंतांनी आज मराठा समाजाच्या मागणीचा अपमान केलाय. मी याचा जाहीर निषेध करतो. सत्तेचा, संपत्तीचा माज असलेल्या तसेच मानसिक रोगी असलेल्या या आरोग्य मंत्र्याचा तत्काळ राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अन्यथा रस्त्यावर फिरणं मुश्कील होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दिला आहे.

 

Published on: Sep 26, 2022 03:33 PM
“नालायक मंत्र्यांना, त्यांच्याच भाषेत मराठा समाज उत्तर देईल”, पेडणेकर सावंतांवर बरसल्या
“प्रकल्प आलाच नव्हता, करार झालाच नव्हता”, आदित्य ठाकरेंचा निषेध करताना श्रीरंग बारणे काय म्हणाले?