राज ठाकरे यांच्या भाषणाला महाराष्ट्र किंमत देत नाही – जयंत पाटील

| Updated on: May 02, 2022 | 9:33 AM

रविवारी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. राज ठाकरे यांच्या भाषणाला महाराष्ट्र काडीचीही किंमत देत नसल्याचे म्हणत जयंत पाटलांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

काल औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेला तुफान गर्दी झाली होती. या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. आता या टीकेने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे फक्त एंटरटेनमेंट असते. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय सभेला कव्हरेज भेट नाही. राज ठाकरे यांच्या या भाषणाला महाराष्ट्र काडीचीही किंमत देत नसल्याची टीका पाटील यांनी केली आहे.

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
दिलासादायक! मे महिन्यात तापमान कमी होण्याचा अंदाज