प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी समोर होणार का हजर? राष्ट्रवादी मात्र आक्रमक; राज्यभर आंदोलनांचा एल्गार

| Updated on: May 22, 2023 | 8:59 AM

गेल्याच आठवड्यात जयंत पाटील यांना ईडीने पहिल्यांदा समन्स बजावला होता. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे जयंत पाटील यांनी चौकशीसाठी हजर होण्यासाठी ईडीकडे आणखी वेळ मागून घेतला होता.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या समन्समध्ये जयंत पाटील यांना आज सोमवारी (22 मे रोजी) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. गेल्याच आठवड्यात जयंत पाटील यांना ईडीने पहिल्यांदा समन्स बजावला होता. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे जयंत पाटील यांनी चौकशीसाठी हजर होण्यासाठी ईडीकडे आणखी वेळ मागून घेतला होता. त्यानंतर आता ईडीने जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले असून ते आज ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर होतात का हे पहावं लागेल. तर त्यांना पाठवलेल्या या नोटीशीमुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. या नोटीशीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे.

Published on: May 22, 2023 08:54 AM
‘त्यांना खोक्यात गुलाबी धनच मिळाले असेल’; सामना अग्रलेखातून भाजपसह शिंदे गटावर खरमरीत टीका
Special Report | बीडमधील ‘भीड’वरून ठाकरे-भाजप समर्थक भिडले, महाप्रबोधन यात्रेत किती गर्दी होती?