नाना पटोले यांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरला राष्ट्रवादी नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाला, ”आकडे आणि निर्णय”
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, तो त्यांचा पक्षांतर्गत निर्णय असेल असं म्हटलं आहे. तर मुख्यमंत्रीबाबत त्यावेळेस असलेलं बलाबलवर ठरवलं जाईल. तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून सहकारी असलेल्या दोन्ही पक्षांचा सन्मान करत राहू असेही जयंत पाटील म्हणालेत.
अहमदनगर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर भावी मुख्यमंत्री असे बॅनर नागपूर येथे लागले. त्यानंतर महाविकास आघाडीसह काँग्रेसवर विरोधकांनी चांगलीच टीका केली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, तो त्यांचा पक्षांतर्गत निर्णय असेल असं म्हटलं आहे. तर मुख्यमंत्रीबाबत त्यावेळेस असलेलं बलाबलवर ठरवलं जाईल. तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून सहकारी असलेल्या दोन्ही पक्षांचा सन्मान करत राहू असेही जयंत पाटील म्हणालेत. तर शेवटी जनता कोणाला साथ देते, कोणाच्या पाठीशी उभी राहील यानंतर हे ठरेल असेही जयंत पाटील म्हणालेत. त्याचबरोबर आमच्यात काही विसंवाद नाही असे देखील पाटील म्हणालेत.
Published on: Jun 05, 2023 12:08 PM