‘राष्ट्रवादीचं आंदोलन म्हणजे तमाशा’, भाजप नेत्याची टीका
इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजवर टीका केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आज (२२ मे) यांनी ईडीच्या चौकशीची नोटीस आली आहे. ते आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजवर टीका केली आहे. तर राज्यभर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन केलं जात आहे. त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्यांनी, आज सकाळपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे नेते मंडळी बोंब मारत आहेत. हा तमाशा आहे. भाजपच्या नेत्यांना, मोदी आणि अमित शहा यांना देखील अशा चौकशांना बोलावण्यात आलं होतं. त्यांना 15-15 तास बसवून ठेवायचे. पण ते चौकशीला, फेस केलं गेले. तुमच्या हिम्मत असेल तर करा ना असं. कशाला मारता बोंब? धिंगाणे कशाला घालता? तमाशा कशाला करता? असा सवाल केला आहे.